माझ्या दिलाचा झाला कावळा !
रात्रन दिन करी तो काव काव,
प्रिये ,
आता तरी माझ्या भेटीस धाव !
--विश्वकुमार
तुझी 'बॉलिंग '...
तुझ्या बॉलिंगवर
प्रत्येक जण फसतो;
कारण तुझा प्रत्येक चेंडू
हा गुगलीच असतो.
तरीही एक गोष्ट
असू दे तुझ्या ध्यानी ,
गुगलीचा बादशहा
जो नरेंद्र हिरवाणी ;
मिळाला त्याला डच्चू
लगेचच संघातुनी !
--विश्वकुमार