सांगून ठेवतो.....
मळलेली ती जुनाट पाउल वाट,
गुमान मुकाट तुडवीत राहण;
आपल्याच्यान जमणार नाही -
बैलासारख घाण्या भोवती फिरणं!
-विश्वकुमार
माझी कविता
माझी कविता,
तुला कधी कळलीच नाही .
मी लिहिण्याचा खूप प्रयत्न केला
पण ........
कविता कधी जुळलीच नाही!
-विश्वकुमार
माझं लिहण...
माझं लिहण
फारस कधी कुणी वाचलच नाही.
लिहायचं पुष्कळदा मनात आल
पण ;
लिहायला कधी बनलच नाही !
-विश्वकुमार
फरक......
निरोप घेताना पाश्चिमात्य
फक्त 'गुड बाय' म्हणतात .
आमचे भारतीय मात्र
धायमोकलून रडतात !
-विश्वकुमार
आठवणी ....
मला भेटलेली 'तू'
अन तुला भेटलेला 'मी'
अजूनही तेथे तसेच आहेत.
आपण मात्र येथे
आता खूप बदललोय !
-विश्वकुमार