कसे वागावे ?

कसे वागावे ?
 असा कसा हा 
विपरीत काळ आला । 
काय म्हणावे या
             कलियुगाला ?
' धर्मराज' म्हणती येथे
        खोटे बोलणाऱ्याला
' कपटी- शकुनी '  ठरवितात
           प्रभू -रामचंद्राला । 
कसे वागावे येथे ?
     प्रश्न पडतो मनाला । 
मग एकच उपाय
दिसतो खास यावरला । 
'सदैव खोटे बोलणे '
  जमणार नाही मला ,
पण खरेही कधी
सांगणार नाही कुणाला । 
     -विश्वकुमार.

विनोद 
केला विनोद तुजवरी 
माझा न दोष काही.
असते एक अन  कधी ; 
भासते दुसरेच काही !
  विनोदासाठी विनोद केला ;
   दुजा न भाव काही .
  होतो जसा काल मी ;
  आहे तसाच आजही !
            -विश्वकुमार.

निवडणूक
लोकशाहीचा घोडा
गाढवांपुढे अडला .
शेषन सारखा माणूसही 
निवडणुकीत पडला !
कारण त्याला फक्त
एक गोष्ट कळली नाही;
गाढवांचा प्रतिनिधी कधीही
घोडा होऊ शकत नाही.
जगाचा न्याय
असा हा आंधळा.
सफरचंद टाकुनि,
खाती भोपळा !
         - विश्वकुमार.